महाराजांची शिव शिकवण.. 🚩🚩

आज काल सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक सणांच एक वेगळच महत्व झाल्य प्रत्येक सण साजरा करून त्याचे फोटो सोशल मिडिया वर टाकने हा एक ट्रेंडचं झाल्य… 

त्यात शिवजयंती निमित्त फोटोशूट करण हा ही एक ट्रेंड झाल्य आणि त्यात ही काही वाईट ही नाही…

पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त सोशल मिडिया पुरताच सिमित राहायला नको तर  आपल्या येणाऱ्या पिढी पर्यंत तो इतिहास पोहचायला हवा..

जशी शिकवण भगवत – गितेतून आणि रामायणातून महाराजांना जिजाऊ नी दिली तशीच जर आपण आपल्या येणाऱ्या पिढीला  शिवरायणच्या इतिहासा बद्दल दिली तर आपल्याला महाराजांचा इतिहास सांगण्या साठी आपल्याला कुठल्याही अभ्यासक्रमावर अवलंबून राहावं लागणार नाही….. 

माता-जिजाऊंची शिकवण 🚩🚩

छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्यांचे पिता शहाजीराजे भोसले बिजापूर सलतनतचे जहागीर होते…

 तेव्हा बाळ शिवाजी महाराज पुणे मध्ये आणि शहाजीराजे घराच्या दूर,  तर माता जिजाऊनीच त्यांना आईचे संस्कार आणि पित्याचे  ज्ञान दिले. लहानपणी पासूनच माता जिजाऊने रामायण आणि महाभारताचे धडे महाराजांना शिकवले आणि त्यातून महाराजांनी अनेक जीवनाचे धडे ही शिकले. जसे की रामायणातून संघ इमारत. भगवान राम समर्थ होते तरीही ते कधी एकटे लढले नाही.. तसेच महाभारतात ही पांडव एकजूट होते..आणि हे सर्व ज्ञान बाळ शिवाजींना खुप लहान वयात मिळाले…

तसेच स्त्रियांचा आदर करणे आणि स्वराज्या बद्दलची दुरदृष्टी ही त्यांना खूप लहान वयात मिळाली.

स्वराज्य फक्त एक स्वप्न होते पण हे सत्य तेव्हाच बनले असते जर हे स्वप्न दुसऱ्यांना पण झोपू न देईल.

अवघ्या ३० वर्षाच्या वयात ३०० पेक्षा जास्त किल्ले जिंकले, ही काही साधारण गोष्ट नव्हती हे फक्त त्यांच्यामूळे शक्य झाले त्यांनी मावळ्यांची लहानपण, विश्वासपात्रता अशी फौज तयार केली…. छत्रपतीनी मावळ्यांना मैत्री आणि आपुलकी दिली, ज्यामुळे मावळ्यांनी ही त्यांना एक साधारण राज्यापेक्षा एक आपले राजे म्हणले….

शिव – आदर.. 🚩🚩

मागील दोन पोस्टमध्ये मी महाराजांच्या इतिहासाबद्दल लिहिले, पण छत्रपतींचा इतिहास इंस्टाग्राम च्या दोन पोस्टमध्ये संपून जाईल एवढा लहान नाही. त्यांच्याकडून शिकण्यासारखं असं खूप काही आहे, ज्यातून आपण तर शिकत आलेलो आहेच आणि येणाऱ्या पिढीला देखील त्यांच्या इतिहासावरून खूप काही शिकायला मिळणार.. 

शिव – आदर.. 🚩🚩

आदर ही अशी गोष्ट आहे जी बळजबरीने किंवा मन जिंकून मिळविली जातो.आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आधीपासूनच आपल्या मनावर राज्य करत आले आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अशा भरपूर गोष्टी आहेत. मग तो स्त्रियांचा आदर असो किंवा गनिमीकावा. स्वराज्य निर्माण करण्याचे ध्यास असो किंवा सर्वांना सोबत घेऊन चालणे, संयम, धाडस, आत्मविश्वास, संकटाविरुद्ध रणनीती, ध्येयाभिमुख दृष्टिकोन,  समाज आणि राष्ट्रापती प्रेम आणि वचनबद्धता असेल तर जीवन कसे बदलू शकते, तर देव तुमची काळजी घेतो. नाविन्यपूर्ण सर्जनशील व्हा आणि आव्हानांवर मात करण्यासाठी मोकळ्या मनाने विचार करा. 

राजे यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून पण ओळखले जाते.

आज शिवजयंती निमित्त आम्ही ही पोस्ट सादर केली, यातून मलाही खूप काही शिकायला मिळालं. विसर पडत चाललाय तो चौथीच्या पुस्तकातला इतिहास आज पुन्हा नव्याने जागा झाला…

तुम्ही पोस्ट ला दिलेल्या प्रेमासाठी मी आणि आमच्या टीम कडून आपले खूप खूप आभार🙏❤️